नागपूर दि. 06 : निवृत्ती वेतन, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2017 रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र (life certificate) स्वत: हजर राहून नोव्हेंबर मध्ये बँकेत सादर करावे.
हयातीचे दाखले सादर करण्याकरिता बँकेत जावू न शकणाऱ्या तसेच बाहेरगावी असणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी जवळच्या संगणक केंद्रात जाऊन ‘जीवन प्रमाण’ या संगणीकृत प्रणालीमार्फत हयातीचे दाखले सादर करावे. ही सुविधा कोषागार व उपकोषागार कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हयातीचे दाखले प्राप्त न झाल्यास निवृत्तीवेतन , कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे माहे डिसेंबर 2017 पासून पुढील निवृत्तीवेतन हयातीचे दाखले प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येईल,असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment