Friday, 3 November 2017

आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ



ग्रामीण भागातील युवकांना स्वच्छता प्रशिक्षणाबरोबरच रोजगारही मिळणार
-         डॉ. दीपक सावंत

मुंबईदि. 3 : आरोग्य क्षेत्रात विविध सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षीत कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याकरिता कुटुंब कल्याण प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्यावतीनेआरोग्याची निगा आणि कौशल्य प्रशिक्षण’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
वैयक्त‍िक आणि सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेतल्यास अनेक रोगांवर प्रतिबंध मिळवू शकतो असे सांगून आरोग्यमंत्री यावेळी म्हणालेही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्यपाणीपुरवठा व स्वच्छताकौशल्य विकास आणि नगरविकास यांच्या विभागांच्या समन्वयातून युवकांना आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
स्वच्छतेच्या अभावामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. उघड्यावर शौच करणे सर्व रोगांचे मूळ असून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात हाणदारीमुक्त गाव आणि शहरे ही मोहीम यशस्वीरित्या राबविली जात आहे. ग्रामीण भागात आरोग्याबाबत जाणीव जागृती व्हावी आणि आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या माध्यमातून मात करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. वैयक्तीक स्वच्छता राखावी स्वच्छ हात धुवावेत या सवयींमुळे निरोगी आरोग्य राखण्यास मदत होणार आहे.
हा अभ्यासक्रम शिकविताना स्थानिक भाषेचा वापर करावाअसे आवाहन करीत आरोग्यमंत्री म्हणालेया प्रशिक्षणामुळे रोजगाराचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. सॅनीटरी इन्स्पेक्टरडायबेटीक एज्युकेटरहॉस्पिटल एड असिस्टंटहोम एड असिस्टंटफर्स्ट रिस्पाँडर या विषयावरील अभ्यासक्रम या अंतर्गत शिकविला जाणार आहे.
राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणालेसंत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनातून आणि लेखनातून ग्रामीण भागात स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. राज्यात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. देशात महाराष्ट्र हागणदारी मुक्त शहरे आणि गावांच्या संख्येत आघाडीवर आहे. लोकांचा सहभाग उत्स्फूर्त असल्याने योजना यशस्वी होत आहे. राज्याची अशीच वाटचाल राहील्यास 2019 पर्यंत राज्य हागणदारी मुक्त होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना रोजगाराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व अधिक प्रभावीपणे मांडणे सोपे होईलअसेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी युनिसेफच्या प्रतिनिधी यास्मिन अलहकश्री. गोयलकेंद्रीय संतालक डॉ. बी.डी. अथानी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सोहळ्यास कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटीलपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment