Tuesday, 7 November 2017

'दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यमंत्री दिलीप कांबळे


मुंबईदि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमदत व पुनर्वसनभूकंप पुनर्वसनअल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीवरून बुधवार दि. ८ नोव्हेंबर आणि गुरुवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे उभारण्यात येणारे स्मारकअपंगासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनालोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चिरागनगर घाटकोपर येथे उभारण्यात येणारे स्मारकमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या  स्वाधार’ योजनेबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी  दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment