Tuesday, 7 November 2017

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत

       मुंबईदि. 7 : अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीशिक्षणशुल्कपरीक्षा शुल्कनिर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने अनुसूचित जातीविजा, भजइमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी अनुज्ञेय फीचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज भरण्यासाठी वित्तीय वर्ष 2017-18 पासून https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.
            सर्व संबंधितांनी उपरोक्त संकेतस्थळावर त्यांचे अर्ज तात्काळ अपलोड करण्याची कार्यवाही करावी. या संबंधी काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उद्भवल्यास टोल फ्री क्र. 18001025311 किंवा mahadbt.helpdesk@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावाअसे सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment