Thursday, 9 November 2017

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दौरा


नागपूरदि09 : पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे आज(ता. 9) रोजी रात्री  9.00 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री  शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी  दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रेशीमबाग मैदानकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता रेशीमबाग मैदान येथील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता रेशीमबाग मैदान येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री  विश्रामगृह येथे मुक्काम.
शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता नागपूर येथून मूल (जि. चंद्रपूर) कडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता मूल (जि. चंद्रपूर) येथून नागपूर येथे आगमन. स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे रात्री 8.25 नागपूर विमानतळावरुन मुंबईकडे प्रयाण.
*****

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा दौरा

नागपूरदि09 : अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी नाशिक येथून सकाळी  8.55 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूर येथे आगमन व रविभवनकडे प्रयाण.  सकाळी 9.30 वाजता रविभवन येथून गांधीबागकडे प्रयाण.  दुपारी 1.30 वाजता लुपीन औषधी कंपनी, मिहान येथे भेट. दुपारी 4.00 वाजता रेशीमबाग येथील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनास भेट. रात्री 8.50 वाजता  नागपूर विमानतळावरुन पुण्याकडे प्रयाण.
****
   
प्र.प.क्र. 876                                                        दिनांक : 09 नोव्हेंबर 2017

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा

नागपूरदि09 : विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांचे मुंबईहून शुक्रवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.50 वाजता नागपूर  विमानतळावर आगमन व मोटारीने दारव्हा   (जि. यवतमाळ) कडे प्रयाण.
शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता  यवतमाळ येथून रविभवन, नागपूर येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता रविभवन येथे विदर्भातील बाजार समितीच्या अडचणीबाबत सभापती व अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विधानमंडळाच्या दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी सुरु होणाऱ्या अधिवेशनासंबंधी करावयाच्या व्यवस्थेबाबत मंत्रिपरिषद दालन कक्ष, पहिला मजला, जुनी इमारत, विधान भवन, नागपूर येथे आयोजित बैठकीस उपस्थिती. त्यांचे रात्री 11.45 वाजता यवतमाळकडे प्रयाण.
*****

                              कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा

नागपूरदि09 : कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे शुक्रवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी खामगाव येथून मोटारीने दुपारी  1.00 वाजता नागपूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 4.00 वाजता रेशीमबाग मैदान येथील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून  विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.20 वाजता नागपूर विमानतळावरुन त्यांचे मुंबईकडे प्रयाण.
*****

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचा दौरा

नागपूरदि09 : वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांचे शुक्रवार, दिनांक 10 नोव्हेंबर रेाजी मुंबई येथून सकाळी 9.10 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व रविभवनकडे प्रयाण. दुपारी 3.55 वाजता रेशीमबाग मैदान, नागपूर येथील ॲग्रोव्हिज प्रदर्शन कार्यक्रामास उपस्थिती. रात्री 8.40 वाजता दुरांतो एक्सप्रेसने भुसावळकडे  प्रयाण.
****

No comments:

Post a Comment