नागपूर दि. 02 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या सर्व वर्गातील होतकरु तरुणांसाठी फुरसतगंज, उत्तर प्रदेश येथे दोन महिन्याचे (डिसेंबर ते जानेवारी) मध्ये Certificate Program in Cutting Operator – Footwear आणि Certificate Program in Closing Operator – Footwear यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी लाभार्थ्याचा वयोगट 18 ते 35 वर्षे असावा., तो किमान 8 वी उत्तीर्ण असावा., सोबत जातीचा व जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, छायाचित्र असणे आवश्यक आहे. जिल्हा कार्यालयामार्फत 13 व 14 नोव्हेंबर 2017 रोजी अर्ज वाटप व दाखल केले जातील. छाननी 17 नोव्हेंबर तर प्रत्यक्ष मुलाखत 20 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान घेतली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी एस.बी.काथवटे यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment