नागपूर दि. 02 : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या निकषानुसार नागपूर येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी निगडीत न्यासांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई 31 डिसेंबर 2017 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सुरु राहणार आहे.
अधिनियमाच्या निकषानुसार प्रयोजन पूर्ण झालेल्या, प्रयोजन बेकायदेशीर झालेल्या, प्रयोजनाची पूर्ती करणे अशक्य झालेल्या, निष्क्रीय व ज्यांनी मागील पाच वर्षात हिशोबाची पत्रके सादर केलेली नाहीत. अशा न्यासांची यादी नियमितपणे या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच धर्मादाय संघटनेच्या charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहावयास मिळेल, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सु.भा. देवरे यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment