नागपूर दि. 02 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती व इतर लाभासाठी वित्तीय वर्ष 2017-18 पासून https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर आपले अर्ज अपलोड करावेत. अर्ज अपलोड करतांना काही तांत्रिक अडचणी किंवा शंका उदभवल्यास DBT टोल फ्री क्र.1800 1025 311 किंवा ईमेल mahadbt.helpdesk@maharashtra. gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गामधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय फीचा लाभ मंजुरीसाठी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजना (DBT) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज स्वत: भरावेत.
*****
No comments:
Post a Comment