नागपूर, दि.22 : कोणत्याही विद्यार्थ्याचा जात प्रमाणपत्र अभावी वैद्यकीय व अभियंत्रकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही. असे समाजकल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्री. हेमंत टकले यांनी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने वैद्यकीय व अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केल्या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री.कांबळे म्हणाले जात पडताळणी अभावी कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाला नसून सर्वोच्च आणि उच्च न्यायलयाच्या आदेशाने प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
0000
No comments:
Post a Comment