मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरुन आज थेट प्रसारण
मुंबई, दि. 26 : उद्या राज्यात सर्वत्र मराठी भाषा गौरवदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गिताच्या समूह गायनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरुन उद्या सकाळी 9.45 वाजता पासून करण्यात येत आहे. या कार्यक्रमास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री मंडळाचे सर्व सदस्य, विधान परिषद व विधानसभेचे सर्व सदस्य, राज्याचे मुख्य सचिव तसेच विविध विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
0000
No comments:
Post a Comment