Tuesday, 27 February 2018

विधिमंडळात मराठी वाड:मय पुरस्कार विजेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर


 मुंबई दि. 27 : मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेतील वाड:मयासाठी 4 सर्वोच्च पुरस्कार आणिराज्य वाड:मय पुरस्कार दिले जातात. आज विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधान परिषदेत आणि विधानसभेत सर्वोच्च  पुरस्कार आणि राज्य वाड.मय पुरस्कार विजेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
मराठी वाड.मयाच्या पुरस्कार विजेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृह सुरु झाल्यावर मांडला. दोन्ही सभागृहातएकमताने मराठी वाड:मय पुरस्कार विजेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला. 
0000

No comments:

Post a Comment