Tuesday, 27 February 2018

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचेसमूह गायन


मराठी भाषा गौरव दिन :
सभापती, अध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत
मुंबई दि. 27 :कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन”म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात, मराठी भाषा विभागव वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, मराठी अभिमान गीत गाऊन अभिनव पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिध्द  गायक कौशल इनामदार आणि त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीताचे मान्यवरांसमवेत समूह गायन केले.
यावेळी विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, दोन्ही सभागृहांचे सदस्य, पुरस्कार प्राप्त मान्यवर साहित्यिक, पत्रकार यांची प्रमुख उपस्थितीती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानभवन प्रागंणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समूह गीत गायनानंतर विधीमंडळाच्या आवारात खास बोलावलेल्या,  प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये प्रथम क्रमांक विजेत्या महाराष्ट्राच्या चित्ररथास सर्वांनी भेट दिली. आज दिवसभर हा चित्ररथ विधीमंडळ आवारात ठेवण्यात येणार आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment