Friday, 1 June 2018

जलसंपदा विभागाचे सचिव च.आ. बिराजदार सेवानिवृत्त


मुंबईदि.1; जलसंपदा विभागाचे सचिव श्री. च. आ. बिराजदार हे काल शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. दक्षिण सोलापूर येथल दर्गनहळ्ळी येथे एका सामन्य शेतकरी कुटूंबात जन्मलेले श्री. बिराजदार यांनी जलसंपदा विभागाचे सचिव लाभ क्षेत्र विकास या पदावर काम करण्यापुर्वी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद येथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे.
          कोणतेही काम निष्ठेने आणि चिकाटीने पार पाडणारे श्री. बिराजदार यांनी पुणेसोलापूर सांगलीचंद्रपूरऔरंगाबादनासिकमुंबई अशा विविध ठिकाणी अधिक्षक अभियंताकार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. उजनी प्रकल्पताकारीम्हैसाळउरमोडीतारळी अशा विवीध प्रकल्पांना त्यांच्या नेतृत्वात गती मिळाली आहे. कोयना टप्पा चारची पॉवर हाऊस ट्रान्सफॉर्मशन हॉलची संकल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी त्यांना शासनातर्फे दोन वाढीव वेतन वाढ देऊन गौरविण्यात आले. उजनी प्रकलासाठी सन 2004-2005चा उत्कृष्ठ अभियंत्यांचा राज्यपाल पुरस्कार देण्यात आला. मराठवाडा येथील दुष्काळी परिस्थितीत जायकवाडी येथिल समन्यायी पाणी वाटपाची कार्यवाही केली होती.
          दि. 1 जून 2017 पासून सचिव ला.क्षे. वि. सचिव म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगीरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यशासनाने 41 लाख हेक्टर एवढे विक्रमी जलसिंचन केले आहे. यासाठी राज्य शासनाला केंद्र शासनाचा विशेष पुरस्कारही प्राप्त झाला आहे. श्री. बिराजदार यांनी राज्यशासनामार्फत हा पुरस्कार स्विकारला होता.

***

No comments:

Post a Comment