Friday, 1 June 2018

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर

          नवी दिल्ली१ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ३४ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी  ६४३ कोटींची गुंतवणूक आणि  केंद्राच्या २०१ कोटींच्या सहाय्यासह १३ हजार ५०६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश
राज्यातील पुणे जिल्हयातील पिंपरी वाघिरेवाघोली आणि म्हाळुंगे तसेच शिरुर तालुक्यातील वाढुहवेली तालुक्यातील वेळू व वडगाव .
अकोला जिल्हयातील अकोटचंद्रपूर शहरनांदेड जिल्हयातील नांदेड वाघाळानाशिक जिल्हयातील मालेगावसातारा शहर,नाशिक शहरसोलापूर शहरअहमदनगर जिल्हयातील राहताकर्जत आणि पाथर्डी तसेच उस्मानाबाद शहर या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत.  
 या बैठकीत ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक व २ हजार २०९ कोटींच्या अर्थ सहाय्यासह देशभरातील १० राज्यांच्या ३७० शहरांसाठी १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत.
0000

No comments:

Post a Comment