Friday, 27 July 2018

सार्वजनिक व जिल्हा ग्रंथालय संघाने 6 ऑगस्टपर्यंत नोंदणी अहवाल सादर करा

नागपूर, दि. 27 :  सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालय तसेच जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे दिनांक ऑगस्टपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे नोंदणी अहवाल सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक ग्रंथालये व जिल्हा ग्रंथालय संघाची नोंदणी रद्द करण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित केली आहे कासंस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली कानोंदणी रद्द झालेल्या संस्थेने याबाबत अपील दाखल केले काप्रकरण न्यायप्रविष्ठ आहे काग्रंथालयाने संघाची घटना व नियमावली प्रमाणित केली आहे काकार्यरत कार्यकारी मंडळास सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची मंजूरी प्राप्त आहे कानसल्यास तसा प्रस्ताव सादर केला आहे का या व इतर संबंधित बाबीसंबंधी माहिती सादर करणारा अहवाल सार्वजनिक ग्रंथालये तसेत जिल्हा ग्रंथालय संघाकडून मागविण्यात आला आहे. अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांना सन 2018-19 मधील परिरक्षण अनुदानातून वगळ्याची कारवाई करण्यात येईल. संबंधितांमार्फत दिनांक ऑगस्ट 2018 पर्यत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे अहवाल सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथपाल ग. मा. कुरवाडे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment