नागपूर, दि. 27 : एनसीव्हीटी संलग्नीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे अपंग मुला-मुलींकरिता जोडारी (फिटर) या व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दिनांक 11 ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे वर्ग 10 वी पास व 40 टक्के अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींना प्रवेश देण्यात येईल. संस्थेच्याwww.admission.dvet. gov.in या संकेतस्थळावर गर्व्हमेंट इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर फिजीकल हॅन्डीकॅप, वर्धा हा विकल्प निवडून इच्छुकास ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य दुध, नाश्ता, दोन वेळचे जेवण, ड्रेस व राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेवाग्राम रोड, लक्ष्मी नगर, वर्धा, मोबाईल नंबर 9922784380, 9730558447 यावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य पी. आ. नागोरे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment