नागपूर दि.30 : इयत्ता 10 वी व 12 वीत 85 टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले अशा गरीब व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणीक मदत करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन धर्मादाय उपआयुक्तांनी केले आहे .
गुणवंत विद्यार्थ्यांना मंडळातर्फे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक शुल्कबाबत सढळ हाताने मदत करावी. इयत्ता 10 वी व 12 वी वर्गात 85 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले असतील अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती असेल तर आपण 12 ऑगस्टपर्यंत सार्वजनिक न्यांस नोंदणी कार्यालयात संपर्क साधावा असे धर्मादाय उपआयुक्त यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment