मुंबई, दि. 30:पुराभिलेख
संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या ‘छत्रपती
राजाराम महाराज यांचे विचार’याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते उद्या मंगळवार दि.31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह
येथे होणार आहे.
पुराभिलेख संचालनालयात सन 1630पासूनचे दुर्मिळ अभिलेख
जतन करण्यात आले असून यामध्ये मराठी, मोडी, इंग्रजी, पर्शियन आणि उर्दू अभिलेखांचा समावेश आहे. राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच त्यांचे सुपूत्र छत्रपती
राजाराम महाराज यांनी राज्यकारभार केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या या
प्रेरणादायी कामाची महती आजच्या युगात आपणाला अनुभवायची असेल तर छत्रपती राजाराम
महाराजांच्या काळातील कागदपत्रे महत्वाची ठरतात. छत्रपती राजाराम महाराजांच्या
कारकिर्दीतील अनेक महत्वांच्या घटनांचे साक्षीदार असणारी कागदपत्रे यांचाही समावेश
आहे. महत्वाची कागदपत्रे, निवडक भाषणे हे सर्व ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे
विचार’या प्रकाशनातून प्रकाशित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक
कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात
लोढा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment