नागपूर, दि. 03 : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सिव्हिल लाईन्स येथील सुयोग पत्रकार निवासस्थानाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून व्यवस्थेसंबंधी माहिती घेतली. तसेच अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकार यदू जोशी, शिबिर प्रमुख महेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment