Saturday, 27 October 2018

दिलखुलास कार्यक्रमात ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथातील श्राव्य लेख


मुंबई, दि. २७ : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि महात्मा गांधीया ग्रंथातील श्राव्य लेख आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती पुनम चांदोरकर यांनी निवेदन केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त महाराष्ट्र आणि महात्मा गांधीया शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथातील न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी लिहिलेले बा-कस्तुरी सुगंधया लेखातून बायांचा निष्कपट आणि नि:स्वार्थ असा आदर्श स्वभाव, महात्मा गांधीजींच्या जीवनात त्यांनी दिलेली मोलाची साथ, गांधीजींच्या जीवनकार्यासाठी बायांनी स्वत:चे जीवन पूर्णत्वाने अर्पण केले आणि गांधीजींच्या अहिंसा शास्त्रातील त्या गुरू बनल्या याबाबतची माहिती देण्यात आली आहे. श्री. अंगद म्हसकर यांनी या लेखाचे वाचन केले आहे.
००००

No comments:

Post a Comment