Wednesday, 2 January 2019

एमएसएमई अंतर्गत 25 उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कर्ज मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

                नागपूर, दि.02 :  सूक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रधान मंत्री  शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात आज उद्यमी ऋण जागृकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आाले होते. या अंतर्गत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते एमएसएमई 59 मिनिटांत कर्ज या योजनेंतर्गत 25 उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.
            स्टेट इंडियाच्या वतीने मुद्रा प्रधान मंत्री उद्योजकता आणि इतर विविध योजनांच्या  25 उद्योजकांना यावेळी  रुपये 6 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या कर्ज मंजुरी प्रमाणपत्राचा समावेश आहे. बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात एमएसएमई यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने कर्ज वितरित करण्यात आाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, एमएसएमईचे सहाय्यक निर्देशक किशोर काळकर, स्टेट बँक इंडियाचे महाप्रबंधक अनिल कुमार, सचिन फडणवीस, अन्न  व औषध विभागाचे शशिकांत केकरे, मनोज तिवारी, डिक्कीचे निश्चय शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सुरेश विंचुरकर, विजय अगस्ती, जीएसटीचे अधीक्षक सुरेश रायलू, इएसआयसीचे शाखा प्रबंधक शिरिष मुठाळ उपस्थित होते.
        उद्यमी ऋण जागृकता अभियानांतर्गत स्टेट बँकेच्या वतीने आज मेळावा घेण्यात आला. यामध्ये उद्योजकाने कर्ज कसे घ्यावे, याबाबत असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध शासकीय कार्यालयात देण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती संबंधित कार्यालयाच्या वतीने उद्योजकांना देण्यात आली. तसेच यावेळी उद्योजकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, अन्न व औषधी  प्रशासन, जिल्हा औद्योगिक केंद्र, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिज (डीआयसीसीआय), वस्तू व सेवा कर, एम्लॉईज स्टेट इंश्युरन्स कार्पोरेशन (इएसआयसी) यासारख्या शासकीय संस्थांचा समावेश होता.
            एमएसएमई अंतर्गत 2 नोव्हेंबर 2018 पासून सुरु झालेले विविध बँकांद्वारे नागपूर जिल्ह्यात उद्योजकांसाठी मेळावे शंभर दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विविध बँकांचे अधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment