Thursday, 3 January 2019

महाविद्यालयांनी प्रलंबित शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्कांचे अर्ज सादर करावेत - डॉ. सिध्दार्थ गायकवाड

नागपूर दि. ०३: भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गंत राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे २०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कांचे ऑनलाईन प्रलंबित अर्ज प्रतिपूर्तीकरीता तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन  प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
      नागपूर विभागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित मागासवर्ग विद्यार्थ्यंच्या शिष्यवृत्तीचे व शिक्षण आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती एकंदरीत नोंदणीकृत अर्ज ८४ हजार ५९६ असून, त्यापैकी ५३ हजार ७३ एवढे अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचे संगणकीय प्रणालीवर दिसून येते. तरी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये कोणताही शिष्यवृत्तीधारक व मात्र विद्यार्थी  शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयांकडून प्रलंबित अर्ज वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत, जेणेकरुन विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस संबंधित महाविद्यालयांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ पाठवावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.
                                                                        *****

No comments:

Post a Comment