Thursday, 3 January 2019

दहेगाव –गुमगाव-टाकळघाट रस्त्याऐवजी वळणमार्गाचा वापर करावा - जिल्हाधिकारी


नागपूर दि.०३ हिंगणा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ ते दहेगाव- गुमगाव-टाकळघाट मार्गावरील वेणा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी डोंगरगाव-वागधरा-कोतेवाडा-गुमगाव ते सालईधाबावरुन हलक्या वाहनांसाठी तर सालईधाबा मार्गे टाकळघाट असा जड वाहनांसाठी पर्यायी वळणमार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
हा मार्ग वेणा नदीच्या पुलावरील बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार असून, या वळणमार्गाचा वापर करण्याबाबत जागोजागी दर्शनी फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या पर्यायी वळणमार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 ****

No comments:

Post a Comment