Saturday, 23 February 2019

कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सवास उत्साहात सुरूवात


     






   नागपूर दि 23 :   रामटेक येथील नेहरू मैदानावर आज कालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सवा आणि आदिवासी संस्कृती पर्वास रसीक प्रेक्षकांच्या साक्षीने उत्साहात  सुरूवात झाली.

            कालीदास समारोह आयोजन समीती ,आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व दक्षीण मध्य क्षेत्र सांस्कृतीक केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित या लोकोत्सवास खासदार कृपाल तुमानेअध्यक्ष राज्य खनिकर्म  महामंडळ आशिष जैस्वाल ,आमदार डी.मल्लीकार्जुन रेडडीकुलगुरू ,नगराध्यक्ष दिलीप देशमुखडॉ.श्रीनिवास वरखेडी ,उपायुक्त सुधाकर तेलंग  पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशांत सवाईराज्यकर सहआयुकत वैजनाथ कामठेवाड  व  माधव कोकणेदक्षिण मध्य क्षेत्राचे डॉ. दिपक खिरवडकरप्रकल्प अधिकारी  डी. चव्हाणउपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे  उपस्थीत होते.
      कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
       यावेळी सरस्वती वंदना आणी अबीर गुलाल याव कीशोर  नृत्य निकेतनच्या वतीने  किशोरी व कामाक्षी हम्पीहोळी यांनी मोहक नृत्याविष्कार सादर केला.दोन दिवसीय  या लोकमहोत्सवात गुजरात येथील सिदधी धमाल तर मध्यप्रदेश येथील बधाइ तर छत्तीसगड येथील मांद्री या कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे.

      कार्यक्रमाचे संचालन सय्यद शिरीन यांनी केले.रसिक प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती  होती.

*****


No comments:

Post a Comment