Monday, 25 February 2019

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019


विधानपरिषदेच्या कामकाजाला वंदे मातरम्‌ने सुरुवात

        मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्‌ने करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूल मंत्री तथा सभागृह नेते चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.
विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर
             अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री गिरीष व्यास, सुभाष झांबड, अब्दुल्ल खान दुर्राणी, डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती जाहीर केली.
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना
विधानपरिषदेत शोकप्रस्तावाव्दारे आदरांजली
            14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अनेक जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विधानपरिषदेत शोकप्रस्तावाव्दारे आदरांजली वाहण्यात आली.
००००




No comments:

Post a Comment