Friday, 5 April 2019

पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 14 हजार 919 मतदान केंद्र


44 हजार ईव्हीएम आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र
73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी कार्यरत
मुंबईदि. 5 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदार संघामध्ये दि. 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116 उमेदवार आहेत. सात मतदार संघात 14 हजार919 मतदान केंद्र आहेत तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार असून वर्धारामटेकनागपूरभंडारा-गोंदियागडचिरोली-चिमूरचंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे.
वर्धा मतदार संघात सुमारे 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र असून 8 लाख 93  हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात17 लाख 41 हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात 2 हजार 364 मतदान केंद्र असून 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला अशी एकूण 19 लाख 21 हजार मतदार आहेत. नागपूर मतदार संघात 2 हजार 65 मतदान केंद्र आहेत. 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला असे एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदार संघात 2 हजार 184 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला असे एकूण 18 लाख 8 हजार मतदार आहेत. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी 1 हजार 881 मतदान केंद्र असून 7 लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख 80हजार महिला असे एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये 2 हजार 193 मतदान केंद्र असून 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22हजार महिला असे एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला असे एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत.
ज्या मतदार संघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.
००००

No comments:

Post a Comment