Wednesday, 3 April 2019

नागपूरसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद भूषण पांडे

निवडणूक विषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

नागपूर, दि.3 :   लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. श्री. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद पांडे हे उत्तरप्रदेशाच्या रायबरेली येथील 25 बटालियनचे कमाँडन्ट असून 2009 या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात मतदारांची गाऱ्हाणे रविभवन येथे कॉटेज क्रमांक-1 येथे स्वीकारतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9022203935 आहे. ते जनतेसाठी तसेच राजकीय पक्ष, उमेदवार अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी रविभवन येथे सकाळी 11 ते 1 व सांयकाळी 5 ते 6 यावेळात उपलब्ध राहतील.
०००००

No comments:

Post a Comment