Tuesday, 2 April 2019

जिल्ह्यात कलम 33,36 आणि 37 लागू


 नागपूर, दि.2 : जिल्हयात एप्रिल ते 14 एप्रिल 2019 दरम्यान दिनांक एप्रिल रोजी जुमदेवजी महाराज जयंती, 6 एप्रिलला गुढीपाडवा तसेच 11 एप्रिल रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 पहिल्या टप्प्यातील मतदान, 13 एप्रिल रोजी रामनवमी, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे  उत्सव साजरे होणार आहे. तसेच नागपूर विद्यापीठांतर्गत पदवीपदव्युत्तर उन्हाळी लेखी परीक्षा  सुरू आहेत.
           दिनांक 11 एप्रिल  2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान नागपूर शहरात होणार आहे. या निवडणकीच्या अनुषंगाने विविध पक्षातर्फे प्रभातफेरी  व प्रचार सभा होणार आहे. निवडणूक प्रचाराकरिता विविध पक्षाचे व्हीआयपीव्हीव्हीआयपी मान्यवर येणार असल्याने सभांमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता  आहे. त्या दरम्यान जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सन 1951 च्या मुंबई पोलिस अधिनियमानुसार 33,36 व 37(1)(3) चे मनाई आदेश 14 एप्रिल 2019 पर्यंत लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध  फौजदारी नियमांतर्गंत  योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,असे सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम यांनी कळविले आहे.
                                       *****

No comments:

Post a Comment