Friday, 5 April 2019

प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्राची त्रुटीपूर्तता 6 एप्रिल ते 6 मे दरम्यान


                                                
नागपूर, दि. 5: सन 2018-19 मध्ये 12 वी विज्ञान शाखेत, व्यावसायिक शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच सेवा (नोकरी), निवडणूक व इतर कारणास्तव अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र  पडताळणी प्रकरणे समितीकडे सादर केलेले आहेत परंतु ज्यांची प्रकरणे त्रुटीपूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांना वारंवार पत्र, एस. एम .एस. तसेच भ्रमणध्वनीद्वारे कळवूनही अर्जदारांनी त्रुटीपूर्तता केलेली नाही, अशा अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह त्रुटीपूर्ततेकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,2रा माळा, विंग बी, शासकीय आय.टी.आय. समोर, दीक्षाभूमी रोड, नागपूर-440022 या कार्यालयात दि. 6 एप्रिल ते 6 मे या कालावधीत संपर्क साधावा. दिलेल्या अवधीत अर्जदारांनी त्रुटीपूर्तता न केल्यास अर्जदारांचे प्रस्ताव नियमाप्रमाणे कार्यवाही करुन परत केले जाईल, याची अर्जदार व पालकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ए. आर. रामटेके यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment