Friday, 5 April 2019

गुढी पाडव्याच्या राज्यपालांकडून शुभेच्छा


मुंबई, दि. 5 : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा तसेच मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढी पाडव्याच्या या आनंददायी सणानिमित्त मी राज्यातील तसेच जगभरातील सर्व महाराष्ट्रीय लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण तसेच नववर्ष सर्वांच्या जीवनात सुखसमाधान व समृद्धी घेऊन येवो. हा सण विविध भाषिक लोक युगादिचेती चाँद तसेच संवर पाडवो म्हणून देखील साजरा करतात. यानिमित्‍ताने मी सर्वांना त्यांच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
००००

No comments:

Post a Comment