Tuesday, 9 April 2019

लोकसभा निवडणूक २०१९/विशेष वृत्त ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !

मुंबईदि. 9 : लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवारआणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षिततासंरक्षित पासवर्डईमेल्ससमाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजीफेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठीस्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचानव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापर प्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेला मराठीहिंदी,इंग्रजीगुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्याट्रोलिंगप्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचनाफेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेसह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी,संचालक (माहिती) सुरेश वांदिलेमहाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक डॉ. बाळसिंग राजपूत आणि  सचिन पांडकरउप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.
 समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्याअफवाप्रक्षोभक मजकूरचित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ॲप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत ॲप्ससंकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.
००००

No comments:

Post a Comment