मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी' या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग मंगळवार दि. 21 मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप, व्याप्ती आणि परीक्षेची तयारी, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी कशी करावी आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी ‘जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment