नागपूर, दि. 11: शासकीय आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय येथे रुग्णालयातील प्रसुतीतंत्र स्रीरोग विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तर्फे एड्स जन-जागृती कार्यक्रम नुकताच अयोजित करण्यात आला होता. यावेळी एड्स आजारासंबंधित जनजागृती करणे, गर्भिणी मातांमध्ये एच.आय.व्ही. तपासणीचे महत्त्व तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्गामध्ये रुग्ण सेवा करत असताना ह्या आजाराची लागण न होण्यासाठी घेतली जाणारी सतर्कता अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत सर्व गर्भिणी मातांची एच.आय.व्ही. मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्य सुभाष राऊत, प्रसुतीतंत्र स्त्रीरोग विभागाचे प्रमुख मनोज गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य दिलीप देशमुख तसेच वैद्य विजय पात्रीकर, उमाळे व अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. विवाहपूर्व तसेच गर्भिणी मातांमध्ये एच.आय.व्ही. तपासणीचे महत्व सांगितले. वैद्य राऊत यांनी सुदृढ समाज निर्माणात शासनाच्या अशा अनेक योजना आणि कार्यक्रमांची मोलाचासहभाग असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन वैद्य बोंबार्डे व प्रीती जाधव यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य श्रावणी व आभार वैद्य नुतन यांनी मानले. या कार्यक्रमात पदवीपूर्व, पद्व्युत्तर विद्यार्थी व रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
*****
No comments:
Post a Comment