विधानभवन परिसरात पुष्पप्रदर्शन
नागपूर, दि. 24 : उपवने व उद्याने विभागाच्या 47व्या वार्षिक पुष्पप्रदर्शनाचे आयोजन उद्या शनिवार, दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता विधानभवन परिसरात करण्यात आले आहे. पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख उपस्थित राहणार आहेत.
उपवने व उद्याने विभागाच्या 47व्या वार्षिक पुष्पप्रदर्शनात 700 विविध प्रजातींची फुले तसेच शोभिवंत झाडांचा समावेश राहणार आहे. पुष्पप्रदर्शनामध्ये विविध प्रजातींच्या फुलांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये ‘किंग ऑफ रोज’ व ‘क्विन ऑफ रोज’ हा किताब सुद्धा देण्यात येणार आहे. बक्षिस समारंभ सायंकाळी साडेपाचला विधानभवन परिसरात आयोजित करण्यात आला आहे. पुष्पप्रदर्शन 26 जानेवारीपर्यंत पुष्पप्रेमींना विनामूल्य पाहता येणार आहे. पुष्पप्रदर्शनास जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन उपवने व उद्याने विभागाचे संचालक विजय रावळ तसेच सहाय्यक संचालक संदीप जाधव यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment