Friday, 24 January 2020

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेतली शपथ

सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता
    नागपूर, दि. 24: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बचत भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी उपस्थितांना यावेळी प्रतिज्ञा दिली.
 भारत निवडणूक आयोगाने सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता ही यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना निश्चित केली आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून, दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या  तरुणांनी आपली नोंदणी करावी. तसेच मतदार ओळखपत्रातील तपशिलामध्ये सुधारणा 13 फेब्रुवारी 2020पर्यत करून घ्याव्यात, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी  शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, श्रीमती आशा पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             
                                                              *******

No comments:

Post a Comment