Friday, 24 January 2020

आज राष्ट्रीय मतदार दिवस युवा मतदारांचा सहभाग वाढविणार


नागपूर, दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती रॅली सेंट ऊर्सुला शाळेमधून सकाळी 9 वाजता निघणार असून, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी 9 वाजता राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदारांना ओळखपत्राचे वाटप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल. तसेच मतदारयादीत नावनोंदणी करण्याच्या विषयावर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी केले आहे.
******

No comments:

Post a Comment