नागपूर, दि. 16: सहकार
विभागाच्या जी.डी.सी. ॲन्ड ए व सी.एच.एम. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी आता 25 मार्चपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी कळविले आहे.
सहकार विभागामार्फत ही परीक्षा 22 ते 24 मे 2020
दरम्यान घेण्यात येणार असून, चालू वर्षात परीक्षारर्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज
स्विकारण्यात येत आहेत. यापूर्वी 16 मार्चपर्यंत
अर्ज करता येणार होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आली असून, हे ऑनलाईन
अर्ज विभागाच्या (https://gdca.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर
भरता येणार आहेत. परीक्षार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या सविस्तर सूचना
विभागाच्या (https://sahakarayukta.maharashtra.gov.in) संकेत
स्थळावर देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत
स्वत:चा युजर आयडी आणि पासवर्ड जतन करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक श्री.
कडू यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment