नागपूर दि. 16 : कोरोना विषाणूच्या वाढत्या
प्रादुर्भावामुळे विभागीय आयुक्त कार्यालय येथील अपर आयुक्त कार्यालयात होणारी
नियमित सुनावणी 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे अपर आयुक्त ए. एस. आर.
नायक यांनी आज सांगितले.
विभागीय आयुक्त
कार्यालयातील अपर आयुक्तांकडे केवळ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या
निर्देशाप्रमाणे या प्राधिकरणापुढे होणारी नियमित सुनावणी व महत्त्वाच्या
तातडीच्या प्रकरणातच सुनावणी घेण्यात येणार आहे. प्राधिकरणापुढील सर्व
याचिकाकर्त्यांना नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध
घालून प्रसार टाळण्यासाठी विविध केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययोजना
करण्यात येत आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे अशी गर्दीची विविध ठिकाणे असून, येथील गर्दी टाळण्यासाठी ते बंद ठेवण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
*****
No comments:
Post a Comment