Monday, 16 March 2020

औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा द्यावी - डॉ. संजीव कुमार

 
नागपूर, दि. 16 :'कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
           डॉ. संजीव कुमार म्हणाले, कोरोनासाठी ठोस औषध तयार झाले नसून रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जगभरातील बहुतांश देश या विषाणूने बाधित झाले आहेत. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून डॉ. संजीव कुमार म्हणाले, उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होवू नये, यासाठी औद्योगिक संस्थांनी गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करु नयेत.  रुग्णांशी संपर्क येणाऱ्या डॉक्टर व नर्ससाठी मास्क वापरणे अत्यावश्यक असून सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी म्हणून खोकताना व शिंकताना केवळ रुमालाची घडी नाक व तोंडाजवळ धरावी, असे सांगून डॉ. संजीव कुमार यांनी विलगीकरण, मास्क वापरण्याची व हात धुण्याची शास्त्रोक्त पध्दत, साफसफाई चे महत्त्व, औद्योगिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न आदी विषयी माहिती दिली.
                                                  00000

No comments:

Post a Comment