नागपूर, दि. 08 : विभागीय लोकशाही दिनात आज एका तक्रारीचा
निपटारा करण्यात आला असून प्रलंबित असलेली तक्रार निकाली काढण्याबाबत संबंधितांना सूचना
देण्यात आल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अपर आयुक्त सामान्य
प्रशासन तुषार मठकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिकेच्या
कार्यक्षेत्रातील अवैध बांधकाम करुन अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण केलेले प्रकरण आज
निकाली काढण्यात आले. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी, महिला व बालविकास,
कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
आज विभागीय लोकशाही दिनात नव्याने एकही अर्ज दाखल झालेला
नाही. प्रलंबित प्रकरणातील तक्रारीनुसार खाजगी
भुखंडाच्या जागेवर महापालिकेने गल्ली रस्ता सोडून रूंद पुल बांधल्याचे प्रकरण तात्काळ
निकाली काढण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली.
00000

No comments:
Post a Comment