नागपूर, दि.23 : विदर्भ साहित्य संघातर्फे दिला जाणारा वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विभागीय माहिती संचालक कार्यालयातील प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे यांचा आज संचालक कार्यालयात अभिनंदन-सत्कार करण्यात आला.
विभागीय संचालक कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते श्री.महालक्ष्मे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, प्रसिद्धी समन्वयक रमाकांत दाणी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्री. महालक्ष्मे यांच्या 'घानमाकड' पुस्तकास हा पुरस्कार जाहीर झाला असून हे पुस्तक गतवर्षी विजय प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आले होते. विदर्भाच्या ग्रामीण भागातील चित्रण ललित पद्धतीने या पुस्तकात मांडले आहे. श्री.महालक्ष्मे यांनी यापूर्वी दै. तरुण भारत, दै. लोकसत्ता ,दै.नवराष्ट्र, दै.लोकशाही वार्ता आणि दै. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्य केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment