नागपूर, दि. 10 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी
सुयोग निवासस्थान येथे भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.
प्रारंभी शिबीरप्रमुख प्रवीण पुरो यांच्या हस्ते पुष्पगुच्छ
देऊन डॉ. गो-हे यांचे स्वागत करण्यात आले. मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष
दिलीप सपाटे, सहशिबिरप्रमुख खंडुराज गायकवाड आदी उपस्थित होते.
विधीमंडळातील निर्णय, शासनाची वाटचाल, महिलांचे प्रश्न व
ते सोडविण्यासाठी शासन स्तरावर होत असलेले प्रयत्न, कायदे व सुव्यवस्था अशा विविध बाबींविषयी
उपसभापती डॉ. गो-हे यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळेपणे संवाद
साधला. यावेळी शिबिराचे सदस्य मिलींद लिमये यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. गो-हे
यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
0000
.jpeg)
No comments:
Post a Comment