डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरला दिली भेट
नागपूर, दि. 10 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथील भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम आणि कन्व्हेंशन सेंटरच्या डागडुजीची कामे
लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज
येथे दिले.
ऑडिटोरियम हॉलच्या बाल्कनी भागातील शीतवाहक डक्ट, शीतवाहक यंत्रणेच्या
पाईप्सचे इन्स्युलेशन, कॉन्फरन्स रुममधील एअर हँडलिंग युनिट, व्हीआयपी गेस्ट रूम, डिझेल
जनरेटर, एक्झिट गेटकडील पाण्याच्या भूमिगत टाकीला वॉटर प्रूफिंग, बेसमेंट पार्कीग आदींची
चर्चा बैठकीत करण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. शिरसाट
यांनी यावेळी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फुट उंचीचा पुतळा लवकरात लवकर
पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
0000

No comments:
Post a Comment