Monday, 8 December 2025

‘माफसू’ आणि कृषी महाविद्यालयाला भेट

 


  

नागपूर, दि. 8 : महाराष्ट्र तथा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व कृषी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

सर्वप्रथम त्यांनी सेमिनरी हिल्स येथील माफसू मुख्य कार्यालयास भेट दिली. येथील विविध प्रयोगशाळा, विभागांची माहिती जाणून घेतली. यावेळी मा. राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, ‘माफसू’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. ‘माफसू’ अंतर्गत येत असलेल्या गोशाळेलाही त्यांनी भेट दिली. गोवंश संवर्धन विशेषतः देशी गायींच्या संवर्धनाच्या सूचना त्यांनी केल्या.

त्यानंतर त्यांनी महाराज बागेजवळील कृषी महाविद्यालयाला भेट दिली व चर्चा केली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडू यांच्यासह संबंधित विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत अधिकाधिक उत्पादनाचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केले.


                                                              *****

No comments:

Post a Comment