नागपूर, दि.19 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्रय रेषेखालील
कुटुंबांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील राणी
अमरावती, बाभुळगाव व यवतमाळ शहरालगत ग्रामीण भागातील जमीन शेतकऱ्यांकडून खरेदी
करावयाची आहे. जमीन शासनास शासकीय दराने विकण्यास तयार आहेत, अशा शेतकऱ्यांनी
आपले अर्ज यवतमाळ येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करावेत, असे
आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत किमान 2 एकर बागायती अथवा 4 एकर जिरायती जमीन स्वत:च्या
मालकीची असणे आवश्यक आहे. जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात प्रकरण अथवा महसूल
विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे अपील प्रकरण चालू नसावे. जमीन बागायती असल्यास
पाण्याची काय सोय आहे व जमीन रस्त्यालगत आहे की, आतमध्ये आहे. आतमध्ये असल्यास
जमीनीकडे जाण्यास रस्ता अर्जात नमूद करावा. जे शेतकरी त्यांची जमीन शासकीय दराने म्हणजेच
जिरायती रुपये 5 लाख व बागायती जमीन रुपये 8 लाख कमाल दर प्रति दराने शासन खरेदी केली
जाईल. ईच्छुक शेतकऱ्यांनी यवतमाळ येथील समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त
यांच्याशी संपर्क साधावा असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
00000

No comments:
Post a Comment