Wednesday, 1 July 2026
विधानभवनात माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन
नागपूर, दि. १ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कृषीतज्ञ स्व.वसंतराव नाईक यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली. विधानभवन प्रांगणात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार ॲड.निलय नाईक यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता शिवाजी माने,अधीक्षक अभियंता नीता ठाकरे,विधानभवनाचे कक्ष अधिकारी कैलास पजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.उपस्थितांनीही पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment