Tuesday, 8 December 2020

 जिल्हा परिषदेकडून 67 अनुकंपाधारकांची पदभरती

         नागपूर, दि. 8 : जिल्हा परिषदेकडून 67 अनुकंपाधारक उमेदवारांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नुकतीच पूर्ण करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. 

            निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कनिष्ठ सहाय्यक 31, वरिष्ठ सहाय्यक 4, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 5, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 2, कंत्राटी ग्रामसेवक 13, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 5, अंगणवाडी पर्यवेक्षिका 3, आरोग्य सेवक (पुरुष) 3 आणि औषध निर्माण अधिकारी 2 अशा एकूण 67 पदांचा समावेश आहे. 

            अनुकंपा उमेदवारांची प्रस्तावित निवड यादी प्रतीक्षा यादीनुसार व त्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केली. तसेच ती यादी  जिल्हा परिषदेच्या सूचना फलक आणि संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. उमेदवारांचे आक्षेप 29 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे  लेखी स्वरुपात मागविण्यात आले होते. 

            आबासाहेब खेडकर सभागृहात सोमवार, दिनांक 7 डिसेंबर रोजी पदस्थापनेची प्रक्रिया राबविण्यात आल्याचे श्री. कुंभेजकर यांनी सांगितले. ही संपूर्ण भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, विभागाने प्राधान्याने पदे भरणे आवश्यक अशा ठिकाणी अनुकंपाधारक उमेदवारांच्या पसंतीनुसार ही पद स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. 

******

                           

 

 



महाआवास अभियानाचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ

* अभियानांतर्गत दहा उपक्रम राबविणार

*शासकीय योजनांचा एकत्रिकरण करा

* सर्वांसाठी घरे उपक्रमासाठी प्रशासन सज्ज

 

        नागपूर दि. 8: सर्वांसाठी घरे 2020 हे केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी धोरण असून या धोरणाची अंमलबजावणी म्हणून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास, शबरी, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम व यशवंतराव मुक्त वसाहत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाआवास अभियानाची सुरवात करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. 

      महा आवास अभियान-ग्रामीण योजनेचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार आशिष जायसवाल, रणधीर सावरकर यांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग नोंदविला तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

       दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिन साजरा करण्यात येतो. 2020-21 या वर्षी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.    

  राज्यातील ग्रामीण आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे, समाजातील सर्व संबंधित घटकांचा सहभाग, घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे, विविध शासकीय योजनांचा कृतीसंगम घडवून आणणे या क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. 

        मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सादरीकरणाद्वारे महा आवास योजनेची माहिती विषद करतांना भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांच्या  उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे   100 टक्के वितरण, घरकुलांच्या उद्दिष्टांनुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्टया पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे. कायमस्वरुपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सीडींग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग, जॉब कार्ड  मॅपिंग 100 टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम, अशा दहा उमक्रमाची माहिती दिली. त्याचबरोबर नावीण्यपूर्ण उपक्रम बहुमजली इमारती उभारणे, पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारुन सहकारी संस्था स्थापन करणे, बँकेचे 70 हजार रुपये कर्ज मिळवून देणे, घरकुल बांधकाम साहित्य उपलब्ध करण्यासाठी बचत गटांच्या सहकार्याने घरकुल मार्ट सुरु करणे, पंचायत राज्य संस्थांच्या व लोक सहभागाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे आदी बाबींची माहिती देण्यात आली. 

            यावेळी खासदार महात्मे यांनी घरकुलाची कामे 100 टक्के पूर्ण करण्याची मागणी करुन धनगर समाजांना शासकीय पट्टयांचे वाटप कोणत्याही अडचणी शिवाय मिळवून देण्याची मागणी केली. आमदार आशिष जायसवाल यांनी पट्टे वाटप, शासकीय जागांचे भूसंपादन करुन लाभार्थ्यांना प्लाट देणे तसेच गरिब घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती नजिकच्या घाटातून उपलब्ध करुन देण्याच्या तीन मागण्या केल्या. 12 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करुन लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करुन दयावी, असे ते म्हणाले. आमदार रणधीर सावरकर यांनी आवास योजनेतील अडथडे दूर करुन तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे गैरसमज दूर होऊन उद्दिष्ट पूर्ण करणे सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. 

            जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घरकुल योजनांची सद्यस्थिती समजावून सांगून कोविड संसर्गामुळे सर्व अधिकारी प्रतिबंधात्मक उपाय योजनेत व्यस्त असल्यामुळे योजनांना गती देणे राहून गेले. आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यामुळे या सर्व कामांना गतिमान करण्यात येईल, असे ते म्हणाले. या अभियानात राज्य, विभाग,जिल्हा व तालुकास्तरीय तसेच पंचायतस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे उपविभागीय अधिकारी, तहसलदार, गटविकास अधिकारी तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आपला परफार्मंन्स दाखवून जास्तीत जास्त पुरस्कार मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. गरब घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती नजीकच्या घाटातून मोफत देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करुन शासकीय जमीनीचे पट्टे द्यावे. 10 दिवसांचा दौरा कार्यक्रम आखून लाभार्थ्यांच्या भेटी घेवून त्यांच्या अडचणीचे निराकरण करावे,असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस तहसलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

****

Monday, 7 December 2020

मृत्यूदर वाढणार नाहीयाची काळजी घ्यावी

                -           पालक मंत्री डॉ. नितीन राऊत

 

उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा  

        नागपूरदि.7: जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची तुलना इतर प्रमुख शहरांशी पुढील काळात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मृत्यूदर वाढणार नाहीयाची प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भातील संपूर्ण माहिती संकलीत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

            कोरोना रोखण्यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमारजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,  महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. अपर आयुक्त जलज शर्माअप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारीमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरपोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओलाआरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवालशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्राजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

            कोरोना प्रतिबंधासाठी मार्च महिन्यापासून जिल्हा प्रशासनपोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली असूनया कालावधीत आरोग्य यंत्रणेने यासंदर्भात केलेल्या कामांची संपूर्ण माहिती तयार करावी. भविष्यातील उपाययोजनाच्या अंमलबजावणीसाठी या माहितीचा उपयोग होईलअसे निर्देश त्यांनी आज  प्रशासनाला दिले.    

            ग्रामीण भागातील कोरोनाबाबत माहिती घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरपरिचरस्वच्छता कर्मचारी यांच्याकडून येत असलेली माहिती महत्त्वपूर्ण ठरणार असूनजिल्हा व आरोग्य प्रशासनाचे कार्य यातून कळेलअसे ते म्हणाले.  कोविड साथीच्या काळात पोलीस विभागाने शिस्त आणि संयमाने काम केले आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची भिती असल्याने त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी ठेवावी. तसेच कोविड काळात झालेले मृत्यू आणि दरवर्षी याच कालावधीत विविध आजाराने होणारे मृत्यू याबाबतचे तुलनात्मक विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

            कोरोना अद्याप संपलेला नसूनकोविडच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची तयारी सुरु आहे. तरीही प्रत्येक नागरिकाने तोंडावर मास्क लावणेवारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यावर अनावश्यक फिरणा-या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश पालक मंत्री डॉ. राऊत यांनी दिले. 

            कोविडशिवाय इतर आजारांमध्ये तसेच कोविडनंतर मानसिक रुग्णांमध्ये वाढ झाली असूनत्याचा वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. तसेच कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या विम्याच्या स्थितीबाबत माहिती घेण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. 

            जिल्ह्यात कोरोनाशिवाय अन्य कारणांनी मृत्यू होत असल्यास आरोग्य विभागाने त्याची तशी वेगळी नोंद करावी आणि मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच मृत्यूदर कमी करताना उपाययोजनांची कमतरता भासल्यास त्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले. 

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी महानगरपालिका व ग्रामीण भागातील खासगी आस्थापनांवर काम करणा-या कामगारांची संपूर्ण माहिती गोळा करण्यावर अधिक लक्ष देण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाला ही माहिती गोळा करताना अडचणी येत असल्यास त्याबाबत माहिती देण्यास सांगितले. 

            श्री. राधाकृष्णन यांनी कोविडसंदर्भात मनपा क्षेत्रातील रुग्णालयांमधील उपलब्ध खाटाअतिदक्षता विभागातील खाटामृत्यू दरपॉझिटीव्ह रुग्णबरे होऊन घरी गेलेले रुग्णडबलींग रेट याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  

*****

 ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबर पासून

सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे एकमत

 

·         मनपा क्षेत्रात डिसेंबरच्या शेवटी घेणार निर्णय

·          

        नागपूर, दि. 7: कोरोना संसर्गामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊतविभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमारजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत सूतोवाच केले असून 14 डिसेंबर पासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्यशिक्षणसार्वजनिक स्वच्छतापोलीस यंत्रणेतील सर्व वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न पुढे आला. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिक्षकांनी अतिशय सकारात्मकपणे शाळा सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नयेअशी सार्वत्रिक भावना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम,अटी पाळून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळांमध्ये शिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

            ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागात पालकांकडून शाळा सुरू करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी पुढे येत असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले. शहरी भागातील शाळा देखील लवकर सुरू करण्याबाबत पालकांची मागणी आहेअसेही ते म्हणाले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण यंत्रणा 14 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

            मनपा क्षेत्रातील शाळा मात्र डिसेंबर अखेरीस सुरू करण्यात येतील,अशी माहिती यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा एक जानेवारीपासून नागपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील शाळा देखील सुरू होतीलअसे संकेत त्यांनी यावेळी दिले.

            नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या मोठ्याप्रमाणात तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 2961 प्राथमिक शाळा आहे. 1250 माध्यमिक शाळा आहेत. मनपा क्षेत्रांमध्ये जवळपास 593 शाळा आहेत.

            ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये लक्ष 34 हजार 527 विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत.तर शहरी शाळांमध्ये जवळपास लक्ष 42 हजार 220 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हे सर्व विद्यार्थी सध्या शाळेपासून दूर आहेत.

*****