मुंबई, दि. 6 : रत्नागिरी जिल्ह्यातील लघुसिंचन प्रकल्पाबाबत त्वरित बैठक घेण्यात यावी, असे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानपरिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
श्री. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील लघुसिंचन प्रकल्प यासंदर्भात एक बैठक घेऊन या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी यांना बोलविण्यात यावे. बैठक विधानपरिषद सभापती यांच्या दालनात आयोजित करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
००००
No comments:
Post a Comment