Friday, 7 April 2017

अमेरिकन संसदीय शिष्टमंडळाची विधानपरिषदेत उपस्थिती


मुंबई दि. 6: अमेरिकन संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य सेनेटर श्रीमती पामेला अन्थॉफ आणि न्युजर्सी असेंब्लीचे सदस्य श्री. राज मुखर्जी यांनी आज विधानपरिषदेत उपस्थिती लावली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्व सभागृहाला या शिष्टमंडळाची ओळख करुन दिली.
यावेळी विधानपरिषदेच्या गॅलरीत अमेरिकन कौन्सुलेट जनरलचे सांस्कृतिक व्यवहार अधिकारी जेम्स फेनेल, वरिष्ठ सांस्कृतिक व्यवहार सल्लागार तस्नीम काळसेकर, राजकीय अधिकारी क्रिस्टन स्वार्झकोप्फ आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशा-देशांतील देवाण-घेवाण वाढावी यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व राज्य विधीमंडळ राष्ट्रीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या भेटीवर आलेल्या या शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजाची पाहणी केली.  
००००

No comments:

Post a Comment