Thursday, 9 November 2017

सहकारी गृह निर्माण संस्थांसाठी नवीन नियमावली सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा


मुंबईदि. 9 : राज्यातील सर्व सहकारी गृह निर्माण संस्थांसाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी गठीत केलेल्या  समितीने सुचविलेल्या नवीन बदलांचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज आढावा घेतला.
            राज्यातील सहकारी गृह निर्माण संस्थांसाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणीसंस्थांचे विभाजनएकत्रीकरणकागदोपत्री दस्तऐवज कमी करणे यामध्ये काय बदल करावेतयाबाबत श्री. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
            मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment